हे जीवनदात्या मज अंतरी याहो
नवज्योती सत नवा अनुभव ध्या, मजला ध्याहो
नव उत्पत्ती ख्रिस्ता ठायी - नवा जन्म मज ध्याहो
नवे हृदय आत्मो देवूनिया - स्तुतिसुमने प्रभू घ्या हो
नवा मनुज मज बनवा प्रभुजी - नव जीवन प्रभु ध्या हो
आत्मिक अन्न नि नूतन वस्त्रे - आत्मिक शोभा ध्या हो
नव बोल प्रभू, नूतन वाचा - नवे गीत शिकवा हो
अमुचे ऐकूनी नूतन संगीत - प्रभुजी प्रसन्न व्हा हो
नूतन शक्ती ध्या आम्हाला - नूतन स्फूर्ती ध्या हो
समस्त अमुचे अर्पण प्रभुजी - सेवा कराया घ्या हो.