#865

Ahes Prabhu Yogya Ek Khara (आहेस प्रभु योग्य एक खरा)

36px
आहेस प्रभु योग्य एक खरा - वधलेला प्रभु तू कोकरा तुझ्या प्रीतीचे न कधी माप - जरी तुझा शत्रू, मी केले पाप तरी तू तारणणारा - एक खरा दुखविले तुज मी कितीदा - आज्ञा तुझी पाळिली न कदा क्षमा तू करणारा - एक खरा निराशेत आशेचा किरण, मजला सतत देतो सांत्वन पहाटेचा तू तारा - एक खरा सर्वरवी सखा मनोहर - तुझीच वाणी परम मधुर लाखात तू मोहरा - एक खरा सर्व सामर्थ्य, बल धन, ज्ञान - स्तुती स्तोत्रे, गौरव, सन्मान योग्य स्वीकाराया - एक खरा गाहो, गाहो, त्याचे स्तवन - सर्व, उपकारांचे करा मनन हाल्लेलुया हर्ष करा - एक खरा