#853Marathi Spiritual Song
Parmeshwar Maza Mendhpal Aahe (Psalm 23 Marathi)
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे
परमेश्वर माझा मेंढपाळ आहे
मझला काहीच उणे पडणार नाही
तो मझला हिरव्याचार कुरणात बसवितो
तो माझा जीव ताजावाना तो करितो
तो आपल्या नामास्तव मझला नीती मार्गाने चालवितो
मृत्युछयेच्या दरीमधुनी मी जात असताना
नाही मुळीच भिणार मी काही आरिष्टाला
कारण तू असशी नित्य माझिया पाशी
तुझी आकडी व तुझी काठी देतात धीर मझशी
शत्रूंच्या देखत माझिया तू ताट वाडीशी
डोक्याला तेलाचा अभ्यंग तू करीशी
माझे पात्र काठोकाठ भरुनी वाहते
खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस
मला कल्याण व दया हि लाभतील
आणि परमेश्वराच्या घरी मी चिरकाल राहील
