#863Marathi Spiritual Song
Vandan Tujala Param Pitya
वंदन तुजला परम पित्या
वंदन तुजला परम पित्या - तारितो तूची मज सदया
पापांची क्षमा तू करितो - रोग मुक्तहि मज करितो
स्तवन करीतो तब आसनी - मन उकळे मुदे तव चरणी
हर्ष भरे गातो गाणी - तारणदुर्गा, तव भजनी
खरा पिता तू असे विरळा - प्रीतिमय तव जिव्हाळा
पश्चिम पूर्व जितकी दूर - तितकी पापे केली दूर
शांत्वन मातेसम दिले - त्रासा मध्ये नच सोडिले
वचनरुपी दुध पाजिले - जीवन सनातन दिधले
