#865Marathi Spiritual Song
Ahes Prabhu Yogya Ek Khara
आहेस प्रभु योग्य एक खरा
आहेस प्रभु योग्य एक खरा - वधलेला प्रभु तू कोकरा
तुझ्या प्रीतीचे न कधी माप - जरी तुझा शत्रू, मी केले पाप
तरी तू तारणणारा - एक खरा
दुखविले तुज मी कितीदा - आज्ञा तुझी पाळिली न कदा
क्षमा तू करणारा - एक खरा
निराशेत आशेचा किरण, मजला सतत देतो सांत्वन
पहाटेचा तू तारा - एक खरा
सर्वरवी सखा मनोहर - तुझीच वाणी परम मधुर
लाखात तू मोहरा - एक खरा
सर्व सामर्थ्य, बल धन, ज्ञान - स्तुती स्तोत्रे, गौरव, सन्मान
योग्य स्वीकाराया - एक खरा
गाहो, गाहो, त्याचे स्तवन - सर्व, उपकारांचे करा मनन
हाल्लेलुया हर्ष करा - एक खरा
